breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुणेकर वेदांगीचा विश्वविक्रम…जलद पृथ्वी प्रदक्षिणा घालणारी आशियातील एकमेव सायकलपटू

पुण्याच्या २० वर्षाच्या वेदांगी कुलकर्णी या तरुणीने अवघ्या २० व्या वर्षी सर्वात कमी दिवसांत सायकलवर जगाची सफर करण्याचा मान पटकावला आहे. यामध्ये तिने १४ देशांची सफर केली असून त्यासाठी तिला १५९ दिवस लागले. यामध्ये तिने सायकलवर २९,००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. वेदांगीने जुलै महिन्यात पश्चिम ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या पर्थ येथून आपल्या या मोहिमेची सुरुवात केली होती. तर ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या एका शहरात तिने या मोहिमेचा शेवट केला. वेदांगी म्हणते, मी दिवसाला ३०० किलोमीटर सायकल चालवायचे. या सर्व प्रवासादरम्यान मला काही चांगले आणि काही वाईट अनुभव आले असेही वेदांगी म्हणाली.

तिच्या या अनोख्या सफरीबाबत तिचे बाबा म्हणाले, जगभरात अतिशय मोजक्या लोकांनी हे अवघड आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे. तर वेदांगी कमी वेळात ही सफर पूर्ण करणारी आशियातील पहिली खेळाडू ठरली आहे. ब्रिटनच्या ३८ वर्षीय जेनी ग्राहम यांनी सर्वात कमी दिवसांत सायकलवरुन पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. जेनी यांना या सफरीसाठी १२४ दिवस लागले होते. आतापर्यंत वेदांगीने अनेक सायकल चालवण्याचे अनेक विक्रम केले असले तरीही हा तिच्या नावावर असलेला एक मोठा विक्रम असल्याचे म्हटले जात आहे. यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास ८० यात्रा तिने एकटीने केल्या आहेत.

आताच्या पृथ्वी प्रदक्षिणेसाठी वेदांगीने मागील २ वर्षांपासून तयारी केली होती. या जगप्रवासात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यावर मात करत तिने अवट्घ्या २० व्या वर्षी आपली ही सफर पूर्ण केली. कॅनडामध्ये तिच्या सायकलमागे एक कुत्रे लागला होता, मात्र त्यातून तिने स्वत:ची सुरक्षितरित्या सुटका करुन घेतली. तर रशियातील बर्फात तिला काही रात्री एकटीला काढाव्या लागल्या. तर स्पेनमध्ये चाकूचा धाक दाखवत तिला चोरट्यांनी लुटल्याचीही घटना घडली. वेदांगी सध्या लंडनमधील Bournemouth विद्यापीठातून स्पोर्टस मॅनेजमेंट विषयातील पदवी घेत आहे. आपले आईवडिल हेच आपली खरी ताकद आहेत असे वेदांगी सांगते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button