breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

ड्रग्ज प्रकरणातील अरमान कोहलीला 1४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई – ड्रग्ज प्रकरणात अटक झालेला अभिनेता अरमान कोहली याला न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. २८ ऑगस्टला एनसीबीने चौकशीनंतर त्याला अटक केली होती. जुहू येथील छाप्यात त्याच्या घरी अंमली पदार्थ सापडले होते. दरम्यान, त्याने आता जामीनासाठी अर्ज केला आहे.

अभिनेता अरमान कोहली यांच्या एनसीबी कोठडीची मुदत १ सप्टेंबरला संपली होती. त्यामुळे आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा ४९ वर्षांच्या अभिनेता अरमान कोहलीला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याच्याबरोबरच ड्रग्ज पेडलर अजय राजू सिंह यालाही न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बिग बॉस या रियालिटी शोमध्येही अरमान कोहलीने भाग घेतला होता. ‘जानी दुश्मन’, ‘प्रेम रतन धन पायो’ अशा काही चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button