“आता ‘चिडी’चा नाही ‘ईडी’चा डाव खेळतात”
३१ जुलै रोजी भाजपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रवेश केला. त्यानंतर ईडीच्या कारवाईची धमकी देऊन पक्षांतर केलं जातं आहे असा आरोप राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. आता याच संदर्भात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही एक ट्विट करत भाजपाची खिल्ली उडवली आहे. पूर्वी काही येत नसेल तर चिडीचा डाव खेळायचे आता ईडीचा डाव खेळतात असे ट्विट करत आव्हाड यांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे.
पुर्वी काही येत नसेल तर…" चिडी" चा डाव खेळायचे
आता " ईडी " चा डाव खेळतात..😂#वा_रे_अच्छे_दिन
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 2, 2019
शरद पवार यांच्या याच वक्तव्यचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपा चिडीचा डाव खेळत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट केलं. त्यापुढेच वा रे अच्छे दिन असंही त्यांनी म्हटलं आहे.