breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“आओ फिरसे दिया जलाएं,बुझी हुई बाती को सुलगाएं “- अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त नमन…

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे . कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेते,पत्रकार ,प्रखर वक्ता अशी त्यांची ओळख होती. त्यामुळेच त्यांना विरोधकांचाही भरभरून प्रेम मिळालं. वाजपेयी यांचा राजकीय प्रवास भारावून टाकणार आहे. त्यांच्या या प्रवासातील काही दुर्मिळ छायाचित्र आणि क्षण पाहुयात…

वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. किशोर वयातच वाजपेयींनी १९३९मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. १९४७ मध्ये त्यांनी संघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता जबाबदारी स्वीकारली.साहित्यीक असलेल्या वायपेयींच वक्तृत्व लोकांच्या मनाचा ठाव घेणारं होतं.माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचाही पक्षाच्या उभारणीत अटलजींसोबत महत्त्वाचा सहभाग राहिला. पंतप्रधान असताना सुषमा स्वराज यांच्यासोबत वाजपेयीजींचे हे काही हास्य क्षण….

त्याचंप्रमाणे अटलजींचे प्रेरणादायी विचारही लोकांना खुप भावायचे…

1. ”छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता.”

2. ”जीत और हार जीवन का एक हिस्सा है, जिसे समानता के साथ देखा जाना चाहिए.”

3. ”अगर भारत धर्मनिरपेक्ष नहीं है, तो भारत बिल्कुल भारत नहीं है.”

4. ”होने, ना होने का क्रम, इसी तरह चलता रहेगा. हम हैं, हम रहेंगे, ये भ्रम भी सदा पलता रहेगा.”

5.  ”मैं हमेशा से ही वादे लेकर नहीं आया, इरादे लेकर आया हूं.”

6. ”लोकतंत्र एक ऐसी जगह है जहां दो मूर्ख मिलकर एक ताकतवर इंसान को हरा देते हैं.”

7. ”मेरे पास ना दादा की दौलत है और ना बाप की. मेरे पास मेरी मां का आशीर्वाद है.”

8. ”आप मित्र बदल सकते हैं पर पड़ोसी नहीं.”

9. ”क्यों मैं क्षण-क्षण में जियुं? कण-कण में बिखरे सौंदर्य को पियूं?”

10.  ​”गरीबी बहुआयामी है यह हमारी कमाई के अलावा, स्वास्थ्य राजनीतिक भागीदारी, और हमारी संस्कृति और सामाजिक संगठन की उन्नति पर भी असर डालती है.”

हे त्यांचे विचार खरोखरचं लोकांच्या मनातला त्यांच्या बद्दलचा विश्वास वाढवायचे.

वाजपेयी यांची कारकीर्द झंझावाती राहिली. तशीच कारकीर्द केंद्रीय निवडणूक आयोगाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी राहिली. त्यांच्या कार्यकाळात शेषन यांनी आयोगाचा प्रचंड दरारा निर्माण केला होता. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाप्रसंगी वायपेयी आणि शेषन

राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर मित्रपक्षातील नेत्यांसोबत बाहेर पडलेले वाजपेयी.

वाजपेयींनी राजकारणाबरोबरच साहित्यातही योगदान दिलं. एका कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतानाचे वाजपेयी.

भाजपाच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांची घट्ट मैत्री होती. वाजपेयी पंतप्रधान असताना आडवाणी यांनी उपपंतप्रधान म्हणून काम पाहिलं. त्यांचेही हे काही क्षण…

दिल्लीत झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत लालकृष्ण आडवाणी, सुंदर सिंग, कैलास जोशी यांच्यासह वाजपेयी यांचे छायाचित्र.

आयएनएस मैसूरच्या अनावरण प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह माजी पंतप्रधान वाजपेयी.

नवी दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान अटल बिहारी वाजपेयींना लालकृष्ण आडवाणी मिठाई भरवतानाचा टिपलेला हा सुंदर क्षण.

२५ डिसेंबर २०१४ रोजी वाजपेयींच्या जन्मदिनी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींना भारत रत्न पुरस्काराची घोषणा केली. भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत ते ९३ वर्षांचे असताना मालवली. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button