breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरीतील भरचौकात चोरट्यांनी सराफी व्यापा-याला लुटले

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत गजबजलेल्या पिंपरी चौकात सराफी व्यापा-याला चोरट्याने लुटले. सराफी व्यापा-याची बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली. दोन लाख 80 हजार रुपयांची रोकड आणि 500 ग्रॅम धातूमिश्रित सोने बॅगमध्ये होते. ही घटना आज बुधवारी (दि. 25) सकाळी दहाच्या सुमारास घडली. रवी अमितचंद मेहता (वय 70, रा. मु. पो. आदनाला, जि. अमृतसर, पंजाब) असे व्यापा-याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी मेहता यांचा सोने विक्रीचा व्यवसाय आहे. धातू मिश्रित सोन्याचे ते व्यापारी आहेत. व्यवसायानिमित्त ते पिंपरीत आले होते. पिंपरी येथील विक्रांत लॉज येथे ते मंगळवारी मुक्कामी होते. बुधवारी सकाळी त्यांना पिंपरीमधील एका ग्राहकाला भेटायला जायचे होते. सकाळी दहाच्या सुमारास ते लॉजमधून बाहेर पडले. पिंपरी स्टेशन रोडवरून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पायी चालत येत होते.

त्यांच्याजवळ एक सॅक होती. ते चौकाजवळ असलेल्या रत्ना हॉटेलसमोर आले असता दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांची बॅग हिसकावली. त्यावेळी मेहता यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. यामध्ये मेहता यांना किरकोळ जखम झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरट्यांना प्रतिकार करताना बॅगचा एक बंद तुटला आहे. मेहता यांच्या बॅगमध्ये दोन लाख 80 हजार रुपयांची रोकड आणि 500 ग्रॅम धातूमिश्रित सोने होते.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पिंपरी पोलिस आणि गुन्हे शाखा तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button