breaking-newsराष्ट्रिय

असिया अंद्राबी एनआयएच्या ताब्यात

नवी दिल्ली – बंदी घालण्यात आलेल्या दुख्तरान ई मिलत या संघटनेच्या प्रमुख असिया अंद्राबी आणि तिच्या दोन साथीदारांना आज एनआयएने ताब्यात घेतले आहे. जम्मू काश्‍मीरात प्रक्षोभक भाषण करून देशाविरूद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा तिच्या विरोधात नोंदवण्यात आला आहे, त्यानुसार तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

जम्मू काश्‍मीर उच्च न्यायालयाने तिचा जामीन रद्द केल्याने ती सध्या श्रीनगरच्या कारागृहात आहे. तेथून तिचा ताबा एनआएआला देण्यात आला आहे. अंद्राबी आणि तिच्या दोन महिला सहकाऱ्यांना आज एनआयए कोर्टापुढे उभे करण्यात आले होते. अंद्राबी हिची दुख्तरन ई मिल्लत ही संघटना दहशतवादी संघटना असल्याचे कारण देत गृहमंत्रालयाने तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश एनआयएला दिला होता.

अंद्राबी हिने नागरीकांना भारताच्या विरोधात जिहाद पुकारून हिंसाचार घडवण्याचे आवाहन केले होते आणि जम्मू काश्‍मीर हे राज्य भारतापासून वेगळे करण्याचा लढा तिने आपल्या संघटनेमार्फत पुकरला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button