breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Corona Virus : कोरोनामुळे घाबरण्याचे कारण नाही ; नरेंद्र मोदींचे ट्विट

नवी दिल्ली | कोरोनाच्या फैलावामुळे घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व यंत्रणा एकत्रित मिळून काम करीत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाताहेत याचा नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आढावा घेतला. या आढाव्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली.

देशात सोमवारी कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळले. दिल्ली आणि हैदराबादमध्ये प्रत्येक एक रुग्ण आढळून आला. या दोन्ही रुग्णांवर विशेष वॉर्डामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. पण एकूणच जगभरात कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत.

चीनमध्ये या आजाराने भीषण रुप धारण केले आहे. एकूण ६० देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता अधिक सतर्क राहण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून काम केले पाहिजे.

स्वतःच्या सुरक्षेसाठी छोटी छोटी पण महत्त्वाची पावले सर्वांनीच उचलली पाहिजेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणती प्राथमिक खबरदारी घ्यावी, याचीही माहिती नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. यामध्ये हात साबणाने सातत्याने स्वच्छ धुवा, खोकताना किंवा शिंकताना तोडांवर आणि नाकावर हात ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button