breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

काँग्रेसने सत्तेबाहेर पडावं; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला

मुंबई |

राज्यातला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यावर अनेक मतमतांतरं आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याने या आरक्षणाच्या प्रश्नावरुन वातावरण तापलेलं आहे. याच मुद्द्यावरुन आता भाजपाचे चंद्रकांत बावनकुळे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुनच काँग्रेसने सत्तेबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे ओबीसी विरोधी पक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  याविषयी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आरक्षण देण्यासंदर्भात तुम्ही काहीही करा. मग ते इम्पिरिकल डेटा असेल किंवा इतर काही. पण जर तुम्ही डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळवून दिलंत तरच आम्ही समजू की तुमच्या मनात ओबीसी समाजाविषयी काहीतरी आहे. डिसेंबरपर्यंत जर आरक्षण नाही झालं तर नेत्यांना आम्ही रस्त्यावर फिरु देणार नाही, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. २०२२ च्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाहीत.

तर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाला सुनावलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी जनगणनेचे काम विशिष्ट आयोगाकडे दिले आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाकडे बैठक घेऊन योग्य ते मनुष्यबळ उपस्थित करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल केली आहे. केंद्राकडे उपलब्ध असलेला इम्पिरिकल डाटा मिळवून देण्याची कोर्टाकडे विनंती करण्यात आली आहे. जर केंद्र सरकार ओबीसींच्या हक्काचा डेटा देत नसेल तर घरोघरी जाऊन डेटा गोळा करावा लागेल. मात्र ही वेळ कुणी आणली? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button