breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:जगभरात कोरोनामुळे ४ लाख लोकांचा मृत्यू

मुंबई : चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला कोरोना विषाणूचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीये. जगभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात मृतांची संख्या जवळपास चार लाखांपर्यंत पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जगभरातील 3,99,642 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत जगातील 68,89,889 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक ग्रस्त देशांच्या यादीत अमेरिका अव्वल आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 1.07 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर, कोरोनामुळे 40,000 पेक्षा जास्त मृत्यू झालेला ब्रिटन दुसर्‍या क्रमांकावर आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत इटलीमध्ये 33000, ब्राझीलमध्ये 32000, फ्रान्समध्ये 29000, स्पेनमधील 27000, मेक्सिकोमधील 11000 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याव्यतिरिक्त, बेल्जियममध्ये 9500, जर्मनीमध्ये 8600, इराणमध्ये 8000 आणि कॅनडामध्ये 7500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button