breaking-newsमहाराष्ट्र

पैठणमधील जायकवाडी जलाशयात नव दाम्पत्याची आत्महत्या

पैठण येथील जायकवाडी जलाशयात एका नव दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. मृत पती- पत्नीचे मृतदेह जलाशयाच्या पाण्यात सकाळी व दुपारी एका मागोमाग तरंगतांना आढळून आले. यानंतर ही हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे अवघ्या सहा महिन्यांअगोदरच त्यांचा विवाह झाला होता. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सचिन विठ्ठलराव लवांडे व किर्ती सचिन लवांडे ( रा. तिसगांव ता.पाथर्डी जि.नगर) अशी त्यांची ओळख असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. फिरण्यासाठी जातो म्हणून रविवारी दुपारी घरातुन बाहेर पडले असल्याची माहती आहे. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी गेटजवळ मृत दांपत्याची मोटारसायकल (क्रमांक एम.एच. 16 बी.के. 6953) आढळून आली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, दोन्ही मृतदेह पैठण येथील रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्याने रुमालाने एकमेकांचे हात बांधून सोबतच जलाशयात उडी घेतल्याचा अंदाज पोलिसांकडून प्रथमदर्शनी वर्तवण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button