breaking-newsराष्ट्रिय

अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज, शुक्रवारी संसदेत मांडला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान १९७०-७१ मध्ये इंदिरा गांधी यांच्याकडे गेला असला, तरी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत. कारण इंदिरा गांधी पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हत्या. १९७०-७१मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र सीतारामन या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वीही त्यांनी पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

तब्बल ४९ वर्षानंतर महिला अर्थमंत्री बजेट सादर करणार आहेत. ५ जुलै शुक्रवारी निर्मला सितारमन संसदेत बजेट सादर करणार आहेत. ४९ वर्षापूर्वी २८ फेब्रुवारी १९७० मध्ये प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. तब्बल ४९ वर्षानंतर एखादी महिला अर्थसंकल्प सादर करणार आहे ही आर्श्चयाची बाब आहे.

दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला देशाच्या आर्थिक स्थितीचे वास्तवदर्शी चित्र स्पष्ट व्हावे यासाठी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जातो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१८-१९चा हा आर्थिक पाहणी अहवाल उभय सभागृहात मांडताना आर्थिक विकासाची गती वाढण्याचा आशावाद व्यक्त केला. तसेच गेल्या पाच वर्षांत देशाने सरासरी ७.५ टक्क्यांनी विकास साधल्याचा दावाही त्यांनी केला.

निर्मला सीतारामन यांनी २००८ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि भाजपमध्ये सक्रिय झाल्या. त्यानंतर २ वर्षांतच त्या भाजपच्या प्रवक्त्या बनल्या. २६ मे २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले. त्या पुन्हा ३ डिसेंबर २०१७ रोजी कॅबिनेटच्या फेरबदलात संरक्षण मंत्री झाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button