breaking-newsराष्ट्रिय

स्क्रू गिळल्याने एक वर्षाच्या चिमुरड्याचा गुदमरुन मृत्यू

एक वर्षाच्या मुलाचा लोखंडी स्क्रू गिळल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिल्लीमधील वजिराबाद येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत कोणतीही संशयी गोष्ट नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. सुश्रुता ट्रॉमा सेंटरने मध्यरात्री उशिरा आमच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली असल्याचं पोलिस उपायुक्त नुपूर प्रसाद यांनी सांगितलं आहे.

बुधवारी शवविच्छेदन केल्यानंतर मुलाचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्क्रू अन्ननलिकेत अडकला होता, यामुळे गुदमरुन मुलाचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

मुलाचं नाव रेहान असून गेल्या १० महिन्यांपासून आपल्या आई-वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहत होता. ते मुळचे बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील आहेत. रेहना एकुलता एक मुलगा होता. वडील मुस्तफा एसी मेकॅनिक म्हणून काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगली कमाई होत नसल्याने तसंच पत्नी आणि मुलाची योग्य काळजी घेण्यात असमर्थ ठरत असल्याने मुस्तफाने पुन्हा आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी त्यांना ट्रेन पकडायची होती.

मंगळवारी रात्री ११ वाजता रेहान घरात खेळत होता. यावेळी त्याची आई यास्मिन प्रवासात जेवण्यासाठी किचमध्ये डबे भरुन घेत होती. वडील मुस्तफा रिक्षा आणण्यासाठी घराबाहेर गेले होते. नेमकं काय झालं याबद्दल कुटुंबीयांना माहिती नाही, पण खेळताना त्याने जमिनीवर पडलेला स्क्रू उचलून तोंडात टाकला असावा असं पोलिसांनी सांगितलं आहे.

‘मुलाने अपघाताने स्क्रू गिळला जो त्याच्या अन्ननलिकेत अडकला. त्याच्या आईने सांगितल्यानुसार मुलगा सतत उचक्या देत जमिनीवर पडला असल्याचं त्यांनी पाहिलं. यानंतर काही वेळातच तो बेशुद्द पडला. मुलाला नेमकं काय झालं आहे हे यास्मिन यांना कळलं नाही. त्यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावून घेतलं’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शेजाऱ्यांच्या मदतीने मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी एक्स-रे काढून पाहिला असता अन्ननलिकेत स्क्रू अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button