breaking-newsराष्ट्रिय

अयोध्येतील राम मंदिराची माहिती देण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाचा नकार

नवी दिल्ली – आपण श्रीरामाचा वंशज असल्याचा दावा करून अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टसंदर्भात मागितलेली माहिती सुरक्षेच्या कारणावरून देण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला आहे. अशी माहिती उघड करणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते असे कारण देत गृहमंत्री अमित शहा यांच्या मंत्रालयाने ही माहिती देण्यास नकार दिला आहे.

गाझियाबाद येथील रहिवासी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशील राघव यांनी ही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली तर एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे अशी माहिती उघडता येत नाही, असे म्हटले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या संदर्भातील कोणतीही माहिती किंवा कागदपत्रे सार्वजनिक केली जाऊ शकत नाहीत. याशिवाय एखाद्या माहितीमुळे एखाद्याचा जीव धोक्यात येत असेल किंवा कोणाला इजा पोहोचणार असेल तर अशी माहिती देता येत नाही, असे गृह खात्याचे सहसचिव मनीष तिवारी यांनी १३ ऑगस्टला त्यांना पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे. यापूर्वी ही माहिती नाकारताना कोणतेही कारण दिले नव्हते. मात्र आता २००५च्या कायद्यातील तरतूदीचा हवाला देऊन त्यांनी ही माहिती देण्यास नकार दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button