breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

लाइफलाइन हॉस्पिटलनं रुग्णाला दिलं २१ लाखाचं बिल; गुन्हा नोंदवण्याची भाजपची मागणी

मुंबई | कोविडच्या संकटकाळात सामान्य नागरिकाला लाखो रुपयांचे बिल पाठविणाऱ्या व जोपर्यंत बिल भरत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यत न देण्याचा मुजोरपणा करणाऱ्या मालाड येथील लाइफलाइन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या राक्षसी लुटमारीचा आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पर्दाफाश केला. मृत रुग्णाच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या रुग्णालयावर तात्काळ गुन्हा दाखल करा तसेच रुग्णाच्या मृत्युप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध तात्काळ ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी दरेकर यांनी केली.

अन्यथा सामान्यांची लुटमार करणाऱ्या या रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला. मालाड पश्चिम येथील लाइफलाइन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाने एसआरएमध्ये राहणाऱ्या एका सामान्य नागरिकाला तब्बल २१ लाखाचे बिल देण्यात आले. दुदैर्वाने तो रुग्ण वाचला नाही. शिवाय ८ लाख भरूनही त्या रुग्णाचा मृतदेह ताब्यात देण्यात येत नव्हता याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी तिथे आज सकाळी रुग्णालयात धाव घेतली आणि रुग्णालयातील लूटमारीचा पर्दाफाश केला.

रुग्णालय सील करून मुंबई महापालिका आणि पोलिसांनी तात्काळ रुग्णायलाच्या विरोधात कारवाई करावी, अन्यथा भाजप आंदोलन छेडेल, असा इशाराही दरेकर यांनी दिला. ‘केवळ लूटमार करण्यासाठीच अशी हॉस्पिटल काढल्याचं लाइफलाइनच्या अनुभवावरून दिसत आहे. ‘हॉस्पिटलमध्ये बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस नंतर पुन्हा बायोपॅक चार्जेस म्हणजे एकाचवेळी दोन-दोन प्रकारचे चार्जेस रुग्णाच्या बिलात लावण्यात आले आहेत. एका पीपीई किटसाठी ३५०० रुपये लावले आहेत. ‘बायोमेडिकल वेस्ट चार्जेस २५०० रुपये प्रमाणे पूर्ण बिलात ७७ हजार ५०० रुपये आकारण्यात आले आहेत. अशाप्रकारे ही लूटमार सुरू आहे. औषधांचे बिल तब्बल १० लाख ६२ हजार असल्याचेही दरेकर यांनी निदर्शनास आणले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button