breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माझ्या बदनामीसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा वापर करणे निंदनीय – महापौर उषा ढोरे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भारतातील मुलींना शिक्षणाचे दार खुले करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रत्येक महिलेला अभिमान वाटतो. सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मी शिक्षण घेऊ शकले आणि त्यांनी दिलेल्या अधिकारामुळेच आज महापौरपदापर्यंत पोहोचू शकले याचे मला पूर्ण भान आहे. परंतु माझ्या राजकीय बदनामीसाठी मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्याचे पसरवले जात आहे, असे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.

एका खासगी कार्यक्रमात बोलताना सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. या आरोपाचे खंडन करताना महापौर ढोरे बोलत होत्या. यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी उपस्थित होते. महापौर ढोरे म्हणाल्या की, महिलांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या सावित्रीबाई यांच्याविषयी मी स्वप्नातही चुकीचे बोलू शकणार नाही. एक महिला महापौर आहे म्हणून त्यांच्या बदनामीसाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोणी राजकारण करणार असेल, तर या शहरातील नागरिक ते खपवून घेणार नाहीत. माझ्या राजकीय बदनामीसाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा वापर करणे निंदनीय आहे.

महापौर ढोरे म्हणाल्या, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सांगवी येथे झालेल्या एका कार्यक्रमाला मी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा संदर्भ देऊन काही जण मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्याचे पसरवले जात आहे. हे माझ्या राजकीय बदनामीचे षड्‌यंत्र आहे. हे सर्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली झाल्यामुळेच शक्य झाले आहे. मी सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच शिक्षण घेऊ शकले. नंतर राजकारणात त्यांच्यामुळेच प्रवेश करू शकले. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळेच मी गेल्या २४ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. मी चार वेळा नगरसेविका म्हणून निवडून आली आहे. उपमहापौर, स्थायी समिती यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केले.

आता महापौर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. माझी उत्तरोत्तर होत असलेल्या राजकीय प्रगतीचा काही जणांनी धसका घेतला आहे. त्यामुळेच माझी बदनामी व्हावी म्हणून थोर महिलेविषयी मी चुकीचे वक्तव्य केल्याचे पसरवले जात आहे, असा आरोपही महापौर ढोरे यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button