breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

गिरीश महाजनांनी मनोज जरांगेंची ‘ती’ मागणी फेटाळली; म्हणाले..

Manoj Jarange Patil : १९६७ सालाच्या आधीच्या ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पण या घोषणेवर जरांगेंची आणखी एक मागणी आहे. आईकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर मुलालादेखील कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी नवीन मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंची ही मागणी फेटाळली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, पत्नी रक्ताच्या नात्यात येत नाही. आई आणि मामा रक्ताच्या नात्यात येत नाहीत. त्यामुळे आई ओबीसी असेल तरी मुलांना ओबीसी आरक्षण देता येणार नाही. या व्यतिरिक्त कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तींचा चुलत भाऊ, मुलगी, मुलाला आरक्षण मिळू शकतं.

हेही वाचा  –  नवीन वर्षात ‘या’ कंपन्यांच्या गाड्या महागणार!

यानंतर जरांगे म्हणाले की, नोंदी सापडल्यानंतर मागेल त्याला आरक्षण देण्याचं ठरलेलं. मग आता पात्र व्यक्तींच्या नातेवाईकांना कसं आरक्षण देणार? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. यावर महाजनांनी आई, पत्नी, मामा रक्ताच्या नात्यात येत नाही, असं म्हटलं. यावेळी जरांगेंनी ‘सगेसोयरे’ शब्दाचा अर्थ काय होतो? असा प्रश्न सरकारच्या शिष्टमंडळाला विचारला. तसेच पुतण्याला सोयरे म्हणायचं का? सगेसोयरे म्हणजे कोण हे अगोदर तुम्ही स्पष्ट करा? असाही सवाल जरांगेंनी केला.

यावरून गिरीश महाजन म्हणाले, सगेसोयरेचा अर्थ तुम्ही मामा, मामी, असा गृहीत धरला. बायकोला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. बाकी आजोबा, काका, मुलांना सर्वांना प्रमाणपत्र मिळेल. आई ओबीसी असेल तरी मुलांना त्यांच्या वडिलांची जात लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button