breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना; खलिस्तानी झेंड्याने झाकला चेहरा

वॉशिंग्टन – कृषी कायद्यावरून पेटलेल्या शेतकरी आंदोलनाचे भारताबाहेर पडसाद उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत असताना वॉशिग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात अमेरिकेत शनिवारी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी खलिस्तानी समर्थकांकडून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यावेळी खलिस्तानचे झेंडेही फडकण्यात आले. या आंदोलकांकडून पुतळ्याच्या चेहऱ्यावर खलिस्तानचा झेंडा गुंडाळण्यात आला. वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाबाहेर हा सारा प्रकार घडला.

भारतीय दूतावासाकडून या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेचा दूतावासाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. शांती व न्यायाचं प्रतिक म्हणून बघितल्या जाणाऱ्या महात्म्याच्या विटंबनेचा आम्ही निषेध करतो, असं दूतावासानं म्हटलं आहे. दूतावासानं अमेरिकेतील कायदा एजन्सीकडेही निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांकडून अशाचप्रकारची निदर्शने करण्यात आली होती. तेव्हादेखील खलिस्तानवाद्यांकडून मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. मात्र, आता खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button