breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मोठी बातमी! टीआरपी घोटाळ्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या सीईओला अटक

मुंबई |

मुंबई पोलिसांनी आज (13 डिसेंबर) आज सकाळी रिपब्लिक टीवीचे सीईओ विकास खानचंदानी याला अटक केलेली आहे. दरम्यान ही कारवाई कथित टीआरपी घोटाळा प्रकरणी असल्याचं सांगितलं जात आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये काही चॅनल्स कडून टीआरपी साठी गैर प्रकार केले जात असल्याची गोष्ट समोर आलेली होती.

Broadcast Audience Research Council (BARC)कडून तक्रार करण्यात आली होती. त्यांनी हंसा रिसर्च ग्रुपच्या तक्रारीवरून आरोप केल्यानुसार काही चॅनल टीआरपीच्या अंकांमध्ये छेडचाड करत असल्याचं म्हटलेलं होतं. मुंबई पोलिसांकडून टीआरपी घोटाळा प्रकरणी 12 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलेले होते. रिपब्लिक टीव्ही ने टीआरपी घोटाळ्याचे आरोप फेटाळले आहेत.

दरम्यान रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी देखील याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत. मागील आठवड्यात त्यांनी टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर स्थगिती आणण्यासाठी कोर्टात धाव घेतलेली होती. यापूर्वी रिपब्लिक टीवीचे वितरण प्रमुख घनश्याम सिंह यांना यापूर्वी कथित टीआरपी घोटाळा प्रकरणी अटक केलेली होती. मजिस्ट्रेट ने घनश्याम सिंह यांना 13 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली होती. त्यानंतर 5 डिसेंबरला त्यांना जामीनावर सोडण्यात आलेले आहे.

आवश्य वाचा- Punenews; भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांच्या बंगल्यात चोरी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button