breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या शून्य

मावळ |

मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.29) एकही रूग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर तालुक्यात दिवसभरात एकही जणाला डिस्चार्ज देण्यात आला नाही. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 02 आहे. शहरी भागात एकही रूग्ण नाही तर ग्रामीण भागात एकही रूग्ण आज सापडला नाही.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण आज सापडला नाही. आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 32,046 झाली आहे. तर दिवसभरात एकही रुग्ण बरा न झाल्याने घरी सोडण्यात आला नाही. मंगळवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात एकही रूग्ण सापडला नाही. 31,519 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 11,039 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 5,093 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,556 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 17,688 रुग्ण तर ग्रामीण भागात 14,358 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.36 टक्के आहे तर मृत्यू दर 1.64 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 00 लोणावळा नगरपरिषदमध्ये 01वडगाव नगरपंचायतमध्ये 00 ग्रामीण भागात 01असे एकूण 02 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button