breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा जळीतकांड; मित्राच्या गाडीसह आजूबाजूच्या दहा दुचाकीही जळून खाक

पिंपरी चिंचवडमध्ये वाहनांचे जळीतकांडाचा प्रकार समोर आला आहे. पिंपरीमध्ये तब्बल 10 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. वाहनं जाळण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन वाद झाला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी एका मित्राने दुसऱ्या मित्राची गाडी पेटवली. मात्र आगीनं रौद्र रुप धारण केल्यामुळं आजूबाजूच्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यामध्ये एकूण 10 गाड्यांचं नुकसान झालं. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील एका पोलिसांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहनं तोडफोडीच्या घटनांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काहीच दिवसांत पुन्हा एकदा हा प्रकार समोर आला आहे.

दोन मित्रांमधील वादातून पिंपरी चिंचवडमधील वाहनांचं जळीतकांड घडून आलं. तीन मित्रांनी एकत्र येत ऋतुराज घोरपडे या तरुणाच्या वडिलांच्या नावाने कर्ज घेऊन कॅमेरा विकत घेतला होतं. लग्न अथवा विविध कार्यक्रमांच्या ऑर्डर्स घेऊन तिघांनी एकत्रित हे कर्ज फेडण्याचं ठरलं. पण नंतर अपेक्षित कामं मिळणं बंद झालं आणि परिणामी हफ्ते थकले.

याचा तणाव ऋतुराज घोरपडेला आला. हाती दुसरं कामही नाही शिवाय वडिलांना काय उत्तर द्यायचं हा प्रश्न ही त्याला सतावत होता. यातून ऋतुराजने कॅमेरा विकून टाकला. त्याच्या सोबत असणाऱ्या एका खाजगी कंपनीत कामाला जाणाऱ्या दुसऱ्या मित्राकडे तो कर्जाचा हफ्ता मागत होता. पण तू कॅमेरा विकला आहेस, तर मग आता मी पैसे का देऊ? यावरून त्या दोघांमध्ये वर्षभरापासून वाद सुरु होते. यामुळे संतापलेल्या ऋतुराजने याचा बदला घ्यायचं ठरवलं. यासाठी मध्यरात्री तो चिंचवडमधील ओम गणेश सोसायटीत मित्राची गाडी पेटवून तिथून पोबारा केला. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर वाहनांच्या जळीतकांडाचं खरं कारण समोर आणलं. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी ऋतुराजला ताब्यात घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button