breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध चांगलेच भडकले

पोर्टलॅंड – अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाने आता उग्र स्वरूप धारण केले असून अमेरिकेने चीनी मालावर वाढीव दराने आयात कर लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता चीननेही अमेरिकेहून आयात केल्या जाणाऱ्या कृषी माल, मत्स्य उत्पादने आणि ऑटो उत्पादनांवर जुलै महिन्यापासून वाढीव दराने आयात कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या कृतीला जशास तसे उत्तर चीनने द्यायचे ठरवले आहे.

अमेरिकेहून चीनला लॉबस्टर नावाचा माशाचा प्रकार मोठ्या प्रमाणात आयात होतो. त्यावर मोठ्या प्रमाणात आता आयात कर लागू केला जाणार असल्याची घोषणा चीनने केल्यामुळे अमेरिकेच्या चीन मधील निर्यातिवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

चीनच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील सीफूड इंडस्ट्रीजच्या मालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. कारण लॉबस्टरची सर्वात मोठी निर्यात चीनला होत होती व चीन मधील अमेरिकेचे ते एक मोठे लोकप्रिय उत्पादन आहे. या संबंधात बोलताना मैन लॉबस्टर मार्केटिंग कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणाले की दोन्ही देशांची सध्या भडकलेली माथी लवकरच थंड होतील आणि आम्हाला त्यावर तोडगा मिळेल अशी आशा आहे.

चीनने आपल्या सरकारी वेबसाईटवर अमेरिकेहून आयात केल्या जाणाऱ्या माशांची यादी जाहींर केली असून त्यात जीवंत माशांबरोबरच फ्रोजन लॉबस्टरचाही समावेश आहे या उत्पादनांवर 25 टक्के दराने आयात कर 6 जुलैपासून लागू केला जाणार असल्याचे चीन सरकारने जाहींर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button