breaking-newsराष्ट्रिय

उत्तरप्रदेशात घरात ट्रक घुसुन सहा ठार

कानपुर – उत्तरप्रदेशात महाराजपुर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोन वर आज सकाळी मातीने भरलेला एक ट्रक कच्चा स्वरूपाच्या घरात घुसून झालेल्या अपघातात सहा जण ठार तर अन्य चार जण जखमी झाले. कल्लु कुरेशी नावाचा कुटुंब प्रमुख आणि त्याच्या घरातील अन्य पाच जण यात मरण पवले. त्यात त्यांच्या दोन नातींचाही समावेश आहे. हे घर झोपडीवजा होते व महामार्गाच्या लगतच उभारण्यात आले होते.

ट्रक चालक भरधाव वेगाने जात असताना त्याचे त्यावरील नियंत्रण सुटूून हा अपघात झाला.पहिल्यांदा या झोपडीवजा घरावर हा ट्रक आदळला त्यानंतर तो त्याच्या शेजारीच उभारण्यात आलेल्या एका पक्‍क्‍या घरावर जाऊन आदळला. जखमींना लालालजतपराय हॉस्पीटल व कांशीराम ट्रॉमा सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर ट्रक चालक पळून गेला आहे त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button