breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

अमित शहा म्हणतात… केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्रच!

मुंबई। ऑनलाईन टीम । महाईन्यूज ।

विधानसभेचा निकाल लागल्यापासून राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्षाला भाजपकडून पूर्णविऱ्हाम देण्यात आला आहे. ‘केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र’ यावर अमित शहा यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुढच्या दोन दिवसांत राज्यात सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना आता भाजपमधून वेग आला आहे.

राज्यात शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेविषयी एकमत न झाल्यामुळे अखेर केंद्रातून अमित शहा यांनी शेवटचा निकाल जाहीर केला आहे. दिल्लीमध्ये कॅबिनेट बैठकीदरम्यान, मोदी आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button