breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेबद्दल अफगान सरकार चिंतित

काही चुकीचे असते तर मीच ही भूमिका केली नसती : संजय दत्त  

मुंबई। प्रतिनिधी । महाईन्यूज ।

सन 1761 मध्ये पानिपतमध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धावर आधारित चित्रपट ‘पानिपत’ बद्दल अफगानिस्तान सरकार चिंताग्रस्त दिसत आहे. सूत्रांनी सांगितले की, अफगान सरकारनुसार, चित्रपट रिलीजसाठी ही योग्य वेळ नाहीये. तर अफगानिस्तानमध्ये अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेवरून सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे. यूजर्सचे म्हणणे आहे की, चित्रपटात अहमद शाह बाबा चा अपमान नाही झाला पाहिजे.

आशुतोष गोवारिकरचा हा चित्रपट वर्षाच्या शेवटी 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे. संजय दत्तसोबतच चित्रपटात अर्जुन कपूर, सदाशिव रावची भूमिका साकारत आहे. तर कृती सेनन त्याची पत्नी पार्वती बाईच्या रोलमध्ये आहे.

अहमद शाह अब्दाली यांचा अपमान होऊ नये… रिपोर्टनुसार पुण्याचे सदाशिवराव भाऊ पेशवे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या चित्रपटाच्या रिलीजबद्दल अफगान सरकार त्रस्त आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे जुन्या काळातील युद्धावर आधारित असल्यामुळे सरकारची इच्छा नाही हा चित्रपट यावेळी रिलीज व्हावा. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच अफगानिस्तानमध्ये सोशल मीडियावर संजय दत्तच्या भूमिकेबद्दल तर्क वितर्क लावणे सुरु झाले आहेत. यूजर्सचे म्हणणे आहे की, चित्रपटात अहमद शाह अब्दालीच्या चरित्रासोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड झाली नाही पाहिजे.

काही चुकीचे असते तर मीच ही भूमिका केली नसती : संजय दत्त अफगानिस्तान के वाणिज्य दूतावास अधिकारी नसीम शरीफीने या प्रकरणावर ट्वीट केले आहे की, संजय दत्तने मला विश्वास दिला आहे की, जर अहमद शाह यांच्या भूमिकेमध्ये काही चुकीचे असते तर तर त्याने ही भूमिका केली नसती. त्याने सांगितले की, मागील दीड वर्षांपासून भारतात असलेले मुत्सद्दी हा प्रयत्न करत आहेत की, चित्रपटात अहमद शाह बाबा यांच्या भूमिकेचा अपमान होता कामा नये. पश्तूनची ऐतिहासिक भूमिका अहमद शाह अब्दाली अफगानिस्तानचे निर्माते आहेत. ज्यामुळे त्यांना तिथे बाबा म्हणाले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button