breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भारत-पाकिस्तान सामन्यापुर्वी शोएब अख्तरचं मोठं विधान; म्हणाला, हा सामना कमकुवत..

IND vs PAK : आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्यात सर्वात मोठा सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दरम्यान, या सामन्यापुर्वी पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठं विधान केलं आहे.

शोएब अख्त म्हणाला, जर तुम्ही धाडसी असाल, तर तुम्ही भारत-पाकिस्तान सामन्याचा पुरेपूर आनंद घ्याल. जर तुम्ही घाबरट असाल, तर मग हा सामना कमकुवत ह्रदयाच्या लोकांसाठी नाही. ही स्पर्धा अशा लोकांसाठी किंवा खेळाडूंसाठी आहे, ज्यांना स्वतःसाठी मोठे नाव हवे आहे. स्वत:ला सुपरस्टार बनवायचे आहे.

हेही वाचा – ‘माझी निवडणुकीची हौस भागली’; उदयनराजेंचं विधान चर्चेत 

गेल्या वर्षी मी दुबईत होतो. मी एका भारतीय वाहिनीवर शो करत होतो. त्या चॅनलवर फक्त एकच गोष्ट बोलली जात होती की टीम इंडिया पाकिस्तानला चिरडून टाकेल. असा दबाव कोण निर्माण करतो? जेव्हा तुम्ही पाकिस्तानला कमकुवत संघ म्हणता, तेव्हा आमच्यावरचा दबाव हटला जातो. त्यामुळे आमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही, असं शोएब अख्तर म्हणाला.

मला विश्वास आहे की पाकिस्तानला तिथे जाऊन भारताला पराभूत करणे सोपे जाईल. कारण प्रायोजक आणि टीव्ही अधिकारांचा दबाव तुमच्यावर असेल, आमच्यावर नाही. बाबर आझम आणि त्याच्या संघाने आक्रमक आणि हुशारीने खेळले पाहिजे. तुम्ही भारताला हरवून अहमदाबादमध्ये फायनल खेळा. मी तुमच्या बरोबर आहे, असंही शोएब अख्तर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button