breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

अभिमानस्पद.! भारतीय वंशाचे नील मोहन यूट्यूबचे नवे सीईओ

२०१५ सालापासून यूट्यूबमध्ये मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून करत आहेत काम

YouTube : यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान व्होजिकी या आपल्या पदावरून पायउतार झाल्या आहेत. आता अमेरिकेत स्थायिक असलेले भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने घोषणा केली आहे.

याआधी नील मोहन हे यूट्यूबचे सीपीओ होते. त्यांना बढती देऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे. नील मोहन २००८ पासून गुगल सोबत काम करत आहेत. २०१३ मध्येच कंपनीने त्यांना ५४४ कोटी रूपयांना बोनस दिला होता.

२०१५ साली ते यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून रूजू झाले. नील मोहन आणि सुसान व्होजिकी यांनी १५ वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यानंतर आता यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नील मोहन यांची नियुक्ती झाली आहे.

दरम्यान, नील मोहन यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. नीलने ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टसह त्याच्या करिअरची सुरूवात केली, जिथे त्यांना ६० हजार डॉलर पगार देण्यात आला. याशिवाय नील यांनी एकसेंचरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे. पुढे त्यांनी DoubleClick Inc मध्ये नोकरी घेतली. नील मोहन काम केले. याशिवाय सुमारे अडीच वर्षे व्हाइस प्रसिडेंट बिझनेस ऑपरेशनची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button