breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अमिताभ यांनी रुग्णालयातून केला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विठ्ठल रुक्मिणीचा फोटो शेअर

बीग बी अमिताभ बच्चनसह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली. सध्या अमिताभ यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीग बी सध्या कोरोना विरोधात झुंज देत असले तरी ते सोशल मीडियावरदेखील तेवढेचं अॅक्टिव्ह आहेत.

अमिताभ यांनी रुग्णालयातून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विठ्ठल रुक्मिणीचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करताना ‘ईश्वराच्या चरणी समर्पित,’ असं कॅप्शन दिलं आहे.

बिग बींनी शेअर केलेल्या फोटोवरून त्यांची देवावर आस्था असल्याचं दिसून येत आहे. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीकडे एक प्रकारचं साकडं घातलं आहे. अमिताभ यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर बच्चन कुटुंबियांच्या प्रकृतीसाठी देश तसेच विदेशातील चाहत्यांनी प्रार्थना केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button