breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

अमरावती – अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाला धक्का देत नाशिक येथील अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला, त्यामुळे अमरावती विभागात बलाढ्य पक्षाला धक्का देत एक अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला.

अमरावती विधान परिषद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे, शिक्षक संघर्ष समितीच्या संगीता शिंदे, अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांनी शेवटपर्यंत लढत दिली. विशेष म्हणजे भाजपाचे उमेदवार नितीन धांडे यांना सातव्या क्रमांकावर समाधान राहावं लागलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button