breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईच्या ‘बेस्ट’ च्या ताफ्यात २६ इलेक्ट्रिक बसेस दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई । प्रतिनिधी

बेस्टच्या ताफ्यात आज टाटा मोटर्स कंपनीच्या 26 इलेक्ट्रीक बस दाखल झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या बसेसचे शुक्रवारी नरीमन पॉईंट येथे दिमाखात लोकार्पण करण्यात आले. या बसेसमुळे इंधनाची बचत होणार असून प्रदुषणास मोठा आळा बसणार आहे. दिव्यांगांसाठी लिफ्टची सुविधा असणाऱया देशातील या पहिल्याच बसेस असून या बसेससाठी टाटा कंपनी मुंबईच्या चार डेपोंमध्ये चार्जिंग स्टेशनही उभारणार आहे.

केंद्र सरकारच्या फेम-2 उपक्रमांतर्गत बेस्टला 340 इलेक्ट्रीक बसची मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचा एक भाग म्हणून 25 आसनी टाटा अल्ट्रा अर्बन 26 इलेक्ट्रिक बसेसचा पहिला ताफा बेस्टमध्ये सामाविष्ट करण्यात आला. उर्वरित बसेसही वेळापत्रकानुसार टप्प्याटप्प्याने बेस्टच्या ताफ्यात सामील होणार आहेत. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेसना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखविला. या प्रसंगी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख,  महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, बेस्ट समिती अध्यक्ष प्रविण शिंदे, पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ, सुहास सामंत, राम सावंत, राजेश ठक्कर, विष्णू कनावजे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, अतिरिक्त महाव्यवस्थापक राजेंद्र मदने, बेस्टचे वरिष्ठ अधिकारी आणि टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बसेससाठी बॅकबे, वरळी, मालवणी आणि शिवाजीनगर डेपोमध्ये टाटा कंपनी ‘चार्जिंग स्टेशन’ उभारणार असून त्यांची उभारणी, देखभाल व व्यवस्थापन कंपनी स्वतच करणार आहे. बेस्टमध्ये भाडेतत्वावरील 40 आणि मालकीच्या सहा अशा 46 इलेक्ट्रिक बस होत्या. आता आणखीन भाडेतत्वावरील 26 बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भाडेतत्वावरील इलेक्ट्रिक बसची संख्या आता 66 झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button