breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावतीत बनावट नोटांचा गोरखधंदा उघड, दोघांना अटक

अमरावती | महाईन्यूज

पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन बनावट नोटांच्या अवैध व्यवसायात तरुण बेरोजगारांना ओढणाऱ्या टोळीचे प्रताप समोर आले असून गुन्हे शाखेने याप्रकरणात दोघांना अटक केलेली आहे. पोलिसांनी लाखोंच्या बनावट नोटा देखील जप्त केल्या आहेत. मंगेश गिरी (जि. अकोला) व रामेश्वर पेटले (बडनेरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अ. शोएब अ. गफ्फार (आसीर कॉलनी) असे फसवणूक झालेल्या बेरोजगार युवकाचे नाव आहे. मंगेश गिरी याची ओळख अ. शोएब याच्यासोबत काही दिवसांपूर्वी झालेली होती. त्याने आपण भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितलेले होते.

शोएब याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने आयएपीस अधिकाऱ्याकडे असणाऱ्या ओळखपत्रासारखे बनावट ओळखपत्र देखील तयार केले होते. अ. शोएब याला पोलीस विभागात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिलेले होते. अ. शोएब याला याकरिता दहा लाख रुपयाची मागणी करण्यात आलेली होती. अ. शोएब याने दहा लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. मात्र त्याच्या मित्राने हा फसवणुकीचा प्रकार असून आपली देखील अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे अ. शोएब यास सांगितलेले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button