breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात २० हजार नवे रुग्ण, ३१ हजार रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई– राज्यात गेल्या २४ तासांत २० हजार ७४० नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर, आज ३१ हजार ६७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच, ४२४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आज सापडलेल्या नव्या कोरोना रुग्णांमुळे राज्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५६ लाख ९२ हजार ९२० इतका झाला आहे. मात्र, त्यातले फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात कोरोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के इतका झाला आहे.

दरम्यान, राज्यातील मृतांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून ५०० च्या खाली उतरला आहे. आज दिवसभरात राज्यात ४२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातला मृत्यूदर १.६४ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, मृतांचा आकडा नियंत्रणात कसा आणता येईल आणि मृत्यू टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे. आजच्या आकड्यांची भर पडल्यानंतर राज्यात आत्तापर्यंत करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा ९३ हजार १९८ इतका झाला आहे.

दरम्यान, मुंबईतील आजच्या आकडेवारीनुसार मुंबई महानगर पालिका क्षेत्रात आज दिवसभरात ९२९ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यासोबत १२३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, त्याचवेळी ३० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, मुंबईतली आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या ७ लाख ३ हजार ४६१ इतकी झाली आहे. त्याचवेळी बऱ्या झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ६ लाख ५८ हजार ५४० इतका झाला आहे. तर मृतांची एकूण संख्या १४ हजार ८०८ इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button