breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

पॅन कार्ड हरवले असेल तर नो टेंशन…काही वेळातच काढा नविन पॅन कार्ड…

कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड अत्यंत आवश्यक आहे . तसेच फोटो, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा यासाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. बँकाचा एक लाख रूपयांपासूनच्या पुढील व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. महत्वाचं असणारं हे पॅनकार्ड हरवलं, तर अनेक अडथळे येतात. त्यामुळे जर चुकून पॅन कार्ड हरवलं तर पुन्हा आपण आपलं पॅन कार्ड ऑनलाइन अर्ज करून मिळवता येत.नवं ऑनलाइन अर्ज करून ड्युप्लिकेट कसं मिळवाल. त्यासाठी पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. तर,पाहुयात अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे.

कसे काढाल ड्युप्लिकेट पॅनकार्ड –

https://www.tin-nsdl.com/ या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर होमपेजवर Reprint of हा पर्याय निवडायचे आहे. Reprint of हा पर्याय न मिळाल्यास Services’आणि ‘PAN’ हे पर्याय निवडा आणि स्क्रोल करून ‘Reprint of PAN Card’ हा पर्याय सिलेक्ट करा.

– पॅन, आधार क्रमांक, जन्मतारीख ही माहिती भरायची आहे.

– पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी आधार डेटाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी खालील बॉक्समध्ये सिलेक्ट करा.

– कॅप्चा कोड एन्टर करून सबमिट करायचं आहे.

– त्यानंतर तुमची पर्सनल माहिती कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसेल.

– ओटीपी येण्यासाठी तुमचा ईमेल, मोबाईल क्रमांकवर पर्याय निवडा आणि Generate OTP वर क्लिक करा.

– ओटीपी सबमिट करा

– ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर तुम्हाला पेमेंट करण्यास सांगितले जाईल. पेमेंटसाठी ‘Pay Confirm’वर क्लिक करा.

– आता पेमेंट करा

– पेमेंट भरल्यानंतर पेमेंट केल्याचा मेसेज तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर येईल. याच मेसेजमध्ये एक्नॉलेजमेंट क्रमांक देखील असेल. यातच ई-पॅन डाउनलोड करण्याची लिंकही दिलेली असेल..

तर अशा सर्व स्टेप्स फॉलो केल्यावर तुम्हाला काही वेळातच तुमचं नवं पॅन कार्ड तुम्ही काढू शकता…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button