breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

दादांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची क्लृप्ती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या जन्मदिवस आहे. या क्षणाचे औचित्य साधून नेत्यांबाबत मनामध्ये कमालीचे प्रेम असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी कोरोनाच्या जिवघेण्या परिस्थितीत सुध्दा त्यांना शुभेच्छा देण्याची शक्कल लढविली आहे. शेवटी अजितदादांवरचे प्रेम व्यक्त झाले पाहिजे, एवढीच त्यामागची भावना दिसते.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी फेसबुक पेज तयार करून त्यावर दादांवरच्या भावना व्यक्त करण्याची माहिती घेण्याचा बेत आखला आहे. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना दादांविषयी असलेली आपुलकी आणि त्यांच्या आयुष्यात दादांचे कार्य, दादांच्या आठवणी, त्यांचे सहकार्य, घेतलेले निर्णय, अधिका-यांना केलेल्या सूचना, मार्गी लावलेली कामे, तसेच ”माझे दादा, माझा अनुभव” या विषयाशी संबंधीत 100 ते 150 शब्दांत लिखान फेसबुक पेजवर पोस्ट करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे दादांना शुभेच्छा देण्याचा विधायक कार्यक्रम गव्हाणे यांनी आखला आहे.

राष्ट्रवादी युवती संघटनेच्या शहराध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी फेसबुकद्वारे कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कार्यकर्त्यांना तोंडाला मास्क लावून स्वतःचे फोटो फेसबुकवर अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ते फोटो व्हॉट्सअॅप डीपी ठेवण्याचे देखील सांगितले आहे. यातूनच आपण दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात, अशीही त्यांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button