breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात 6 ठार

काबुल: अफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये 6 जण ठार झाले आहेत. हजारा समुदायावर तालिबानींनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हजारो अफगाणी नागरिक निदर्शने करत होते. तेथून जवळच हा आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. या निदर्शकांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न हल्लेखोराकडून केला गेला होता. मात्र निदर्शकांपासून 200 मीटर अंतरावरच्या चेकपॉईंटवर त्याला अडवण्यात आले होते.

या बॉम्बस्फोटात 20 जण जखमी झाल्याचे गृहमंत्रालयाचे प्रवक्‍ते नजीब दानिश यांनी सांगितले. काबुलमधील एका शाळेच्या समोरच हा बॉम्बस्फोट झाला. जखमी झालेल्यांमध्ये बहुतेक जण सुरक्षा रक्षक आहेत. मात्र यात सर्वसामान्य नागरिक आणि महिलाही जखमी झाले असल्याचे दानिश यांनी म्हटले आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.

हजारा समुदायावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ रविवारी रात्रीपासूनच निदर्शने सुरू झाली होती. सोमवारीही ही निदर्शने सुरू होती. या निदर्शनांमध्ये विद्यापिठातील विद्यार्थीही सहभागी होते. गझनी प्रांतातील हजारा बहुल दोन जिल्ह्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी हे निदर्शक करत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button