breaking-newsपिंपरी / चिंचवड

अन्यायाच्या विरोधात लढा उभा केला, तरच संघटना मोठी होईल – डॉ. रघुनाथ कुचिक

  • वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर
  • निगडी शाखेसह शहरातील विद्युत कर्मचा-यांचा संघटनेत जाहीर प्रवेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांमध्ये संघटनेचे काम करताना राजकीय काम कमी आणि कंपनीचे काम सर्वाधिक प्राधान्याने करावे. कंपनीचा विकास झाला तरच कर्मचा-यांना त्याचा आपोआप लाभ होतो. त्यामुळे कंपनी सक्षम करण्यासाठी संघर्ष करा. अन्यायाच्या विरोधात लढा उभा करा, त्यानंतरच कर्मचा-यांचे हीत साध्य होईल, असे आवाहन शिवसेना उपनेते तथा राज्याच्या किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी केले.

आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपनेते कुचिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष राजन भानुशाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक व महाराष्ट्र विद्युत सनियंत्रण समिती पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर , भारत कुंभारकर, दक्षिण नांदेड विधानसभा  शिवसेना संपर्क प्रमुख दीपक शेंडे, कार्याध्यक्ष विनायक जाधव, शिलरत्न साळवे, संयुक्त सरचिटणीस प्रशांत लबडे पाटील, सरचिटणीस शुभम दिघे, मार्गदर्शक संजय जाळीन्द्रे, पुणे प्रादेशिक अध्यक्ष राजेश गाढवे रुपीनगर शिवसेना विभाग प्रमुख नितीन बोंडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. कुचिक म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान असले पाहिजे. कंपनीला बुडविणा-यांच्या विरोधात आपण सक्षमपणे आवाज उठविला पाहिजे. कंपनी मोठी झाल्यानंतर त्याचा लाभ प्रत्येक कर्मचा-याला होत असतो. संघटनेत राजकीय काम कमी पण कंपनीच्या विकासासाठी सर्वांनी जात-धर्म-पंथ बाजुला ठेवून एकत्र आले पाहिजे. आपण एकीचे बळ दाखविले तर 20 टक्के खासगीकरणाचा मुद्दा सुध्दा थोपवून लावू शकतो. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने संघटनेचे काम केले पाहिजे, असेही कुचिक म्हणाले.

राजन भानुशाली म्हणाले की, गाव तिथे वीज आणि वीज तिथे वायरमन आहे. म्हणजेच गाव तिथे सभासद होण्याची खात्री आहे. प्रत्येकाला संघटनेच्या धाग्यात गुंफता आले पाहिजे. जात-पात-धर्माचे राजकारण संघटनेत केलं जात नाही. स्व. बाळासाहेबांच्या विचारांवर आपण चालतो. हे विचार प्रत्येक कर्मचा-याच्या डोक्यात रुजविण्याचे कम केले पाहिजे. संघटनेचे प्रामाणिक काम केले तरच आपण कंपनीला मोठे करू शकतो. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लढा उभा करू शकतो, असा सल्लाही त्यांनी सदस्यांना दिला.

असंख्य कर्मचा-यांचा संघटनेत जाहीर प्रवेश

असंख्य कर्मचा-यांनी वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेत प्रवेश केला. तसेच, पुणे व बारामती परिमंडळ कार्यकारिणीतील पदाधिका-यांना कुचिक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. अजित जाधव, दिगंबर पांचाळ, अशोक पवार, उमेश काळे, सतिश फडतरे, गणेश कांबळे, किरण गायकवाड, अमोल काळे, कुमार सुरगुंड आदींचा संघटनेत जाहीर प्रवेश झाला. त्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. निगडी शाखेतील किरण नलगे, राजश्री शेगावकर, मिना भुरगुंडे, सुमित सोमकनवार, अंकुश मानकर, गजानन शेळके आदींचा देखील संघटनेत जाहीर प्रवेश झाला.

नवनियुक्त पदाधिका-यांना मानपत्र वाटप

वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेची पुणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पदी मनोहर शिंदे यांची निवड झाली. उपाध्यक्ष अमोल नांदे, कार्याध्यक्ष निलेश मानकर, सल्लागार संदीप गावडे, सहकार्याध्यक्ष धनंजय पवार, सचिव महेश दरेकर, सहसचिव अमोल हंडीबाग, खजिनदार राहुल गाडे, महिला आघाडी अध्यक्षा मालती लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना उपनेते कुचिक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाचे संयोजन संतोष सौंदणकर, राजेश गाढवे, मनोहर शिंदे व अमोल नांदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश दरेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आकाश पवार यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button