breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

किराणा दुकानांमध्ये काम करणारे कामगार, भाजी आणि इतर विक्रेत्यांची कोरोनाची चाचणी करण्याचे आरोग्य मंत्रालयाचे आदेश

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर सध्या अनलॉकिंगनुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अटीशर्थींसह दुकाने, मार्केटसह काही गोष्टी सुरु झाल्या आहेत. आता किराणा दुकानांमध्ये काम करणारे कामगार, भाजी आणि इतर विक्रेत्यांची कोरोनाची चाचणी करण्यात यावी अशी सुचना आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे. त्याचसोबत जर त्यांची कोरोनाची चाचणी न केल्यास त्यांच्या मार्फत प्रादुर्शाव परसण्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे.

विविध राज्यात सुद्धा कोरोनाचे दिवसागणिक हजारोंच्या संख्येने रुग्णांची भर पडत असल्याने स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत तेथे लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. पण अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहतील असे सुद्धा सांगण्यात आले आहे. तर महाराष्ट्र, पुणे, मुंबई, नवी मुंबईसह औरंगाबाद येथे ही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा प्रंचड प्रमाणात वाढत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button