breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाबाधीत रुग्णांना चाचणी अहवाल वेळेत द्या, अन्यथा आंदोलन करणार – सचिन चिखले

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना रुग्णांचे अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणी अहवाल लवकरात लवकर देण्यात यावेत, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे.

यासंदर्भात चिखले यांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्ण शहरात वाढत असुन यामध्ये महापालिकेच्या वतीने कोरोना रुग्णांचे आरटीपीसीआर व अँटीजेन हे चाचणी अहवाल ९ ते १० दिवस रुग्णांना मिळत नाहीत. त्यामुळे शहरातील असंख्य कोरोना बाधित रुग्ण दगावत आहे.

चाचणी अहवाल वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेळ लागतो. अशा अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. यामध्ये नुकतीच एक घटना घडली आहे. रुपीनगर मधील एका व्यक्तीची आरटीपीसीआर ही चाचणी अहवाल उशीरा आला. त्यामुळे ही व्यक्ती मयत झाली. तरी कोरोना चाचणी अहवाल रुग्णांना दोन दिवसात मिळावा, अन्यथा मनसेच्या वतिने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चिखले यांनी दिला आहे.  

निवेदन देताना चिखले यांच्यासह अंकुश तापकिर, मयुर हजारे, गणेश उज्जेनकर, जय सकट, काशीनाथ जाधव, प्रदिप गायकवाड आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button