breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अन्यथा शिवसेना स्टाईलने मेट्रो व्यवस्थापनाला इंगा दाखवू

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – निगडी ते दापोडी रोडवर मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोचे काम वारंवार वादाच्या भोव-यात अडकत असून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे समोर आले आहे. कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही. त्यातच नागरिकांची सुरक्षाही रामभरोसेच आहे. संबंधीत मेट्रो व्यवस्थापनाला कामाचा दर्जा आणि सुरक्षेबाबत सक्त ताकीद द्यावी, अन्यथा शिवसेना कामबंद आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेने मेट्रोला दिला आहे.

संदर्भात शिवसेनेचे विधानसभा प्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी मेट्रोचे उपव्यवस्थापक संजय डुबे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी निकृष्ट दर्जाचा पीलर उभा केला जात होता. संबंधीत विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर तो पिलर पाडण्यात आला. शनिवारी (दि. ५) दुपारी अडीचच्या सुमारास नाशिक फाटा कासारवाडी याठिकाणी मोठी क्रेन कोसळली. त्यामुळे कंपनींचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

मेट्रोचे काम करणा-या संबंधीत कंपनीकडून निगडी ते दापोडी मेट्रोचे काम होत आसताना कामगारास काही जखम झाल्यास किंवा आपघातामध्ये कामगार दगावल्यास कोण जबाबदार आहे. मेट्रो व्यवस्थापनाने कामातील दर्जा आणि कामगारांची सुरक्षितता या दोन्ही गोष्टींबाबत सतर्क राहावे अन्यथा शिवसेना स्टाईलने कामबंद करण्यात येईल, आसा इशारा दाखले यांनी निवेदनातून दिला आहे.

निवेदन देताना प्रदेश सचिव गणेश आहेर, प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसेना विभागप्रमुख गोरख पाटील, प्रदिप दळवी, मारूती मस्के, प्रविण खरात, दत्ता गिरी, बाळासाहेब गायकवाड, गणेश पाडुळे, खंडु शिरसाठ, पुणे शहर महीला अध्यक्षा सुनिता खंडाळकर, सारीका ताम्हचीकर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button