breaking-newsक्रिडा

पाकिस्तानच्या बाबर आझमचा धमाका! विराटलाही टाकले मागे

पाकिस्तानच्या संघाची न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानच्या बाबर आझमीने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. त्याने याआधीच्या सामन्यांमध्ये ९२ आणि ६२ धावांची खेळी केली होती. पण त्याला शतक झळकावता आले नव्हते. अखेर रविवारी त्याने शतक झळकवले. हे शतक त्याच्यासाठी खास ठरले. कारण त्याच्या या खेळीमुळे त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली याचा विक्रम मोडला.

२०१८ मध्ये खेळलेल्या दहा डावांमध्ये त्याने ५ डावात अर्धशतकी खेळी केली आहे. बाबरने नाबाद १२७ धावांची खेळी करताना न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला मोठी धावसंख्या गाठून दिली. त्यामुळे आता त्याची २०१८मधील कसोटी क्रिकेटमधील सरासरी ६७.१७ झाली असून त्याच्या खात्यावर ४७४ धावा जमा झाल्या आहेत. कोहलीने २०१८ मध्ये कसोटीत ५९.०५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कोहलीच्या सध्या या वर्षात १८ डावांमध्ये १ हजार ६३ धावा केल्या आहेत.

दरम्यान, पाकिस्तानने पहिला डाव ५ बाद ४१८ धावांवर घोषित केला. दोन वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत बाबरला आपली छाप पाडता आली नव्हती. पण आता त्याची बॅट चांगलीच तळपू लागली आहे. पहिल्या दिवशी पाकिस्तानने ४ बाद २०१७ धावा केल्या होत्या. त्यानंतर हॅरीस सोहेल आणि बाबर आझम यांनी पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. हॅरीसनेही शतकी खेळी (१४७) केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button