breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बेताल वक्तव्याचा पिंपरीत जाहीर निषेध

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून सातत्याने बेताल वक्तव्य तसेच कृती केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने पिंपरीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी विनोद तावडेंच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आणि वादाचे अतूट नाते आहे. काही महिन्यातून एकदा वादग्रस्त विधान ते देत असतातच. झेपत नसेल तर शिक्षण सोडून द्या, असे वक्तव्य त्यांनी नुकतेच केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यांचा पिंपरीत निषेध करण्यात आला.यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, गणेश पाडुळे, मारूती मस्के, प्रदिप दळवी, संजय शिंदे, अंकुश कोळेकर, दत्ता गिरी, रविकिरण घटकार, भिमराव कुलकर्णी, निलेश भोरे, आपना वतन संघटनेचे जितेंद्र जुनेजा, शिवशाही व्यापारी संघाचे तेजस दाखले, शिवबंधन सोशल फाऊंडेशनचे सौरभ शेंडगे, धनराज दाखले, अनिकेत थोरात, तेजस थोरात, तुषार थोरात, शाम मांढरे, गणेश इंगळे, डॉ. इम्राम बेग, रिजवान बेग, दिपक कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button