breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अन्यथा काळेवाडी ते चिखली मार्गावर बस धावु देणार नाही

– स्विकृत नगरसेवक दिनेश यादव यांचा इशारा

पिंपरी | प्रतिनिधी

काळेवाडी ते चिखली हा बीआरटीएस मार्ग सुरू करण्याच्या पालिकेच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करा, अन्यथा बसेसला या मार्गावर धाऊ देणार नाही, असा इशारा मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी पालिका आयुक्तांना दिले असून, चिखली तसेच कुदळवाडी भागातील मार्गावर अनेक अडचणी असून त्यांची सोडवणूक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, कुदळवाडी रस्त्यावर असलेले खड्डे, नादुरुस्त फूटपाथ, कुदळवाडी ते मोई फाटा मार्गावर नो पार्किंग फलक आणि दुरावस्थेत असलेले दुभाजक या सर्वांच्या दुरुस्तीची गरज आहे. याशिवाय या मार्गावर बंद असलेले पथदिवे आणि ड्रेनेज तसेच स्टॉर्म वॉटरची नसलेली व्यवस्था आदी कामे मार्ग सुरू होण्याआधी करावीत असे यादव यांनी आपल्या आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

याशिवाय बस थांब्यावर कुठलेही वेळापत्रक नसल्याने नागरिकांना बसच्या बाबतीत माहिती कशी मिळणार?असा सवाल त्यांनी केला आहे. मार्ग सुरू करण्याची घाई न करता या भागात असलेली गर्दी आणि वाहतूक समस्या आणि त्याचा नागरिकांवर पडत असलेला प्रभाव याचाही विचार मनपाने करावा असे त्यांनी म्हटले आहे. उपरोक्त कामे केल्याशिवाय जर बस मार्ग सुरू केला तर बस वाहतूक होऊ देणार नाही आणि आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा शेवटी त्यांनी दिला आहे.

चिखली आणि कुदळवाडी भागातील विकासकामांना दूजाभाव मिळत असल्याची या भागातील नागरिकांची भावना आहे. आणि त्याला यादव यांनी वाचा फोडली असल्याने नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button