breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

विद्या विनय निकेतन विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी | प्रतिनिधी

कै. नारायणराव चोंधे शिक्षण संस्थेच्या विद्या विनय निकेतन विद्यालयात भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

डॉ. राजदत्त देवरे, डॉ. प्रियांका देवरे, डॉ. अंकुश अग्रवाल, डॉ. नेहा अग्रवाल, प्रभाग क्रमांक 26च्या विद्यमान नगरसेविका आरती चोंधे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर संकेत सुरेश चोंधे, आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुधाकर वेदपाठक, पुरुषोत्तम दोमकुंडवार आदि उपस्थीत होते.

डॉ. राजदत्त देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजदत्त देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुधाकर वेदपाठक यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, ब्लड शुगर तपासणी, ईसीजी, एचबीए 1 सी, लिपिड कोलेस्ट्रॉल आणि दंत तपासणी आदि तपासण्या करण्यात आल्या. या आरोग्य शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button