breaking-news

धक्कादायक! खर्डी येथे रेल्वे रुळावर आढळून आला लष्करी जवानाचा मृतदेह

पंढरपूर | महाईन्यूज

जम्मू-काश्मीर येथे भारतीय लष्करात कार्यरत असलेला जवान बेळगाव येथे ट्रेनिंगसाठी आल्यानंतर त्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून, रविवारी खर्डी ( ता. पंढरपूर) रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बेळंकी (ता. जत) येथील अनुसे सुुखदेेेव भागाप्पा (वय २७) हा भारतीय सेना दलात २०१३ पासून कार्यरत असून प्रशिक्षणासाठी तो रविवारी बेळगाव येथे दाखल झाला. दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्या ठिकाणाहून दुपारी बाहेर पडला. सोमवारी दुपारनंतर त्याचा संपर्क होत नसल्याने मंगळवारी या बाबत बेळगाव पोलिसात कळविण्यात आलेले होते.

खर्डीजवळ रेल्वे रुळावर रविवारी सुखदेव यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या खिशात कोल्हापूर-सोलापूर रेल्वेचे पाच फेब्रुवारीचे तिकीट तसेच इतर कागदपत्रे देखील आढळून आली आहेत. त्याच्या नातेवाईकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थाली भेट दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button