breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत होर्डिंग्ज काढणा-या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे आयुक्तांना पत्र

भाजप सल्लागाराच्या घशात कंत्राट ?  

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील 300 अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले आहेत. ते होर्डिंग्ज काढण्यास तब्बल साडेतीन कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीतून खर्च करण्यात येणार आहेत. एक होर्डिंग्ज काढण्यास सुमारे सव्वा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, अनधिकृत होर्डिंग्ज ज्यांनी लावले त्यांनी काढणे अपेक्षित असताना त्यावर कोट्यावधीचा खर्च करणे अयोग्य आहे. अनधिकृत होर्डिग्ज हटविण्याचे कंत्राट सत्ताधारी भाजप सल्लागाराच्या घशात घालण्यात आले असून संबंधित ठेकेदारांला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.   

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे.  त्यात म्हटले आहे की,  आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत सध्या जाहीरत फलक, होर्डींग्ज काढणेची कारवाई मोठ्या प्रमाणावर चालू आहे.  हे अनाधिकृत होर्डींग्ज काढण्यास स्थायी समिती सभेत विषय क्र. ४४, ठराव क्र. ३६०५ अन्वये र.रु. ३ कोटी ५० इतकी वाढीव तरतूद करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

शहरातील अनधिकृत होर्डिग्ज लावणा-यांना नोटीस देवून त्या होर्डिग्ज काढून संबंधितांकडून दंडात्मक वसूली करावी, शहरातील ३०० अनधिकृत फलक काढण्यास तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. एक अनाधिकृत  होर्डींग्ज काढण्यास सुमारे सव्वा लाख रुपये खर्च येणार आहे. अनधिकृत होर्डींग्ज ज्यांनी लावले आहेत. त्यांच्याकडूनच काढून घेणे अपेक्षित असताना महापालिका त्याच्यावर कोट्यावधी खर्च करीत आहे. त्याकरिता साडेतीन कोटी खर्च करणार आहे. सत्ताधारी भाजपच्या महापालिकेतील सल्लागाराला हे कंत्राट देण्यात आल्याची चर्चा आहे. 

सदरील वाढीव खर्चाच्या ठरावाची अंमलबजावणी न करता शहरातील अनाधिकृत मिळकतींना नोटीसा देऊन त्या काढण्याच्या सुचना दिल्या जातात त्याप्रमाणे अनाधिकृत होर्डींग्ज ठेकेदारांना नोटीसा बजावण्यात याव्यात. यामध्ये धोकादायक होर्डींग्जचा प्राध्यान्याने समावेश करावा.  नोटीस बजावूनही संबधितांना होर्डींग्ज न काढल्यास मनपामार्फत ते होर्डिंग्ज काढण्यात यावेत.  त्याचा खर्च व दंड संबंधित ठेकेदारांकडून वसूल करण्यात यावा. त्याना काळ्या यादीत टाकण्यात यावे. असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button