Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

जादूटोण्याच्या संशयातून तरुणाला नदीत फेकले

नागपूरः जादूटोण्याच्या संशयातून नदीत फेकण्यात आलेल्या नितीन शंकर धमगाये (वय ३६, रा. नागसेनवन) याचा यशोधरानगर पोलिसांनी भंडाऱ्यातील जवाहरनगरसह तब्बल १२ गावांमध्ये शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही.

दरम्यान, नितीनच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी अजय चोखांत्रे या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. त्याचीही ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. तो चालक आहे. अटकेतील आरोपींची संख्या आता चार झाली आहे. यापूर्वी पोलिसांनी सूत्रधार मंगेश मोतीलाल झलके (वय ३६, रा. गजानननगर, एमआयडीसी), सूरज भाऊराव झाडे (वय २८, रा. पंचसूत्रा कॉलनी, कपिलनगर) व अंकित प्रकाश शेवते (वय ३०, रा. रुईगंज, जुनी कामठी) या तिघांना अटक केली. मंगेशची पत्नी शहर पोलिस दलात कार्यरत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी रविवारी व सोमवारी कन्हान, कामठी, भंडाऱ्यातील जवाहरनगरसह सहा गावांमधील नदीच्या पात्रात पट्टीच्या पोहणाऱ्याच्या मदतीने नितीनचा शोध घेतला. मात्र, तो आढळला नाही.

‘त्या’ तरुणीच्या भूमिकेचाही शोध

गुरुवार, २१ जुलैला अपहहण केल्यानंतर मंगेश, सूरज, अंकित व त्यांच्या साथीदारांनी नितीनला हिंगण्यातील फार्महाऊसवर नेले. तेथे त्याला मारहाण केली. याचदरम्यान एक तरुणीही तेथे आली. यावेळी तिची भूतबाधा उतरविण्यास मंगेशने नितीनला सांगितले. नितीनने पूजा करून तिची भूतबाधा उतरवण्याची प्रक्रिया केली. गुप्तधन शोधण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस या तरुणीच्या भूमिकेचाही तपास करीत असून, लवकरच तिची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button