breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत बांधकामे नियमितीकरण ; महापालिकेची विशेष सभा बोलवा – शिवसेनेची मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज )-  पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास शुल्क महापालिकेने ठरवावे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानुसार,  नागरिकांची बांधकामे नियमित करण्यासाठी शुल्क ठरविण्यासाठी तातडीने महापालिकेने विशेष सभा घ्यावी,  अशी मागणी शिवसेने केली आहे. 

शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहर संघटक सुलभा उबाळे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, विधानसभा संघटक रोमी संधू, जितेंद्र ननावरे, नगरसेवक प्रमोद कुटे आदींनी महापालिकेतील सभागृह नेते एकनाथ पवार यांना निवेदन दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी चिंचवडगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी शुल्क ठरविण्याचे अधिकार संबंधित महापालिकांना देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनुसार शहरात अवैध घरांमध्ये राहणा-या नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यानुसार, अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी शुल्क ठरविण्याकरिता तातडीने महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button