breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वेस्ट टू एनर्जी, शितलबाग पादचारी मार्गासह आवास योजनेसाठी न्यायालयात जाणार – दत्ता साने

पिंपरी ( महा ई न्यूज )-  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पांमध्ये आर्थिक घोटाळा झाला आहे.  त्याचे दर  नवनगर विकास प्राधिकरणापेक्षा अधिक आहेत. त्या संदर्भात न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी आवास प्रकल्पानेच सत्ताधारी भाजप गैरव्यवहार केला आहे. भाजपचे प्रमुख नेत्यांनी त्यामध्ये हात धुवून घेतले आहेत. त्या गैरव्यहाराची कुणकूण लागल्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वडमुखवाडीतील गृहप्रकल्पाचे भूमिपूजन ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली, असा आरोप साने यांनी केला.

भाजपच्या दोन्ही आमदारांमध्ये या प्रकल्पाच्या कामावरून एकमत न झाल्याने बोर्‍हाडेवाडीत प्रकल्प स्थायी समितीने दप्तरी दाखल केला आहे. या प्रकल्पाचे दर प्राधिकरणापेक्षा अधिक आहेत. ही मंडळी गोरगरीबाच्या घरांमध्येही लोणी खाण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसने जेएनएनयुआरमध्ये अंतर्गत राबविलेल्या घरकुल योजनेत 398 चौरस फूट आकाराच्या सदनिकासाठी 3 लाख 76 रूपयांना उपलब्ध करून दिल्या. केवळ 4 वर्षांत हे दर वाढून तब्बल 10 लाख 42 हजार रूपयपर्यंत पोहचले आहेत.  त्यातही केवळ 323 चौरस फूट आकाराची सदनिका देण्यात येणार आहे. केवळ ठेकेदारांशी संगनमत करून वाढीव दर निश्‍चित करून सदर काही प्रकल्पांना मागील स्थायी समितीने मंजुरीही दिली आहे. त्यातील काही प्रकल्पांना वर्कऑर्डरही दिली आहे.

तसेच भोसरीचा शितलबाग पादचारी मार्ग, वेस्ट टू एनर्जी, पंतप्रधान आवास योजना प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकल्पात संगनमत करून वाढीव दर दिले गेले असून, त्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करणार आहे, असे साने यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button