breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अध्यक्षपदाच्या नादात डोणगावकर दांपत्याने गमावला पक्ष; आता दिले स्पष्टीकरण

मुंबई | महाईन्यूज

जिल्हापरिषद अध्यक्षपदाचा मोह शिवसेना नेते कृष्णा पाटील डोणगावकर आणि माजी अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगावकर यांना चांगलाच महागात पडला आहे. सत्तार यांनी कुमक पुरवल्यानंतर डोणगावकर दांपत्यांला बळ मिळालेले होते. मात्र पद तर गेलंच, शिवाय पक्षातूनही या दांपत्याची हकालपट्टी झालेली आहे. त्यावर आता कृष्णा पाटील डोणगावकर यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मंत्री अब्दुल सत्तार राजीनामा देणार अशी चर्चा एक दिवस माध्यमांमध्ये सुरू होती. दुसरीकडे डोणगावकर दांपत्य जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ठाम होते. अखेरीस सत्तार यांचे मंत्रीपद सुरक्षीत राहले तर डोणगावकर यांच्या हातून अध्यक्षपदही गेलं आणि पक्षापासून दूर व्हावे लागलेले आहे. मात्र भाजपला रोखण्यासाठीच आपण हे सगळं केल्याचे कृष्णा पाटील डोणगावकर यांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button