breaking-newsमुंबईराजकारणराष्ट्रिय

जेएनयुतील हल्ल्याचा नाना पाटेकरांकडून कडून निषेध

नवी दिल्ली | महाईन्यूज

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी (दि.5) विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा देशातील पुडुच्चेरीपासून ते विदेशातील कोलंबिया, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही तीव्र निषेध केलेला आहे. देशभरात या हल्ल्याचे तीव्र पडसाद जाणवले असून पुणे अन् मुंबईतही विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. राजकीय पक्षांनीही या घटनेचा धिक्कार केला असून, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतांनीही या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवलेला आहे.

नानाने जेएनयुमधील हल्ल्याचा निषेध नोंदवताना, देशातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रेमाचा सल्ला दिलेला आहे. जेएनयुमधील विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे, असे आवाहन अभिनेता नानाने केले आहे. तसेच, जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेधही नानाने नोंदवला आहे. ‘विद्यार्थी म्हणून आम्हीही होतो आणि तुम्हीही आहात पण मुळात आपले आई-वडिल कोणत्या परिस्थितीतून आपल्याला शिकवतात हे विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. कारण, आम्हाला आता जर का कोणत्या राजकीय पक्षाने लोटलं तर आमचं विद्यार्थी म्हणून करिअर संपून जातं, हे राजकीय पक्ष सोडायला येत नाहीत आणि विद्यार्थ्यांना हे कळतं कस नाहीये. व त्यामुळे, विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष द्यावे, असे नाना पाटेकर यांनी म्हटलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button