breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना करावा लागतोय लोकल प्रवासात गर्दीचा सामना; लोकल फेऱ्यांची बोंब

मुंबईत लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना न देता फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच देण्यात आली होती. मात्र सुरवातील अटोक्यात असणारी ही प्रवाशांची संख्या नंतर वाढत गेली त्यामुळे आता त्या प्रवाशांनाही लोकलचा प्रवास करताना अनेक अडचणी येत आहे. प्रवासीसंख्या वाढली मात्र रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या न वाढल्याने कार्यालयीन वेळेत अत्यावश्यक सेवेत असलेल्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे.

१५ जूनला मंत्रालय, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय व खासगी रुग्णालयातील काही मोजक्याच विभागांतील कर्मचाऱ्यांचा मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने प्रवासाची मुभा होती. त्या वेळी अडीच लाख प्रवासी संख्या असेल, असा विचार करत मध्य रेल्वेने २०० आणि पश्चिम रेल्वेने २०२ लोकल फे ऱ्यांचे नियोजन के ले. ३० जूनपर्यंत पश्चिम रेल्वेवर ८६,१६९ आणि मध्य रेल्वेवर ५४,१८७ प्रवासी संख्या होती. १ जुलैपासून अन्य काही शासकीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली. म्हणून पश्चिम रेल्वेने आणखी १४८ आणि मध्य रेल्वेवर १५० फेऱ्या चालविण्याचे ठरविले. या दोन्ही मार्गावर प्रत्येकी ३५० लोकल फे ऱ्या धावत आहेत.

२ जुलैला पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची संख्या १ लाख तर मध्य रेल्वेवरील प्रवाशी संख्या ६४ हजार होती. सप्टेंबर महिन्यापासून सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली. पश्चिम रेल्वेवरून १५ सप्टेंबरला २,२५,६९२ प्रवाशांनी लोकल प्रवास के ला, तर मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दीड लाखावर गेली आहे. तुलनेत लोकल फे ऱ्यांची संख्या तेवढीच आहे.

दरम्यान यामुळे प्रवाशांना शेवटी खेटूनच प्रवास करावा लागतोय ..त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ठरवून दिलेल्या नियमांचा फज्जा उडवताना पहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button